उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
"औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता,” म्हणून समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमीने औरंग्याचे उदात्तीकरण केले आणि महाराष्ट्रात प्रखर संतापाची लाट उसळली. ‘छावा’ चित्रपटामुळे क्रूरकर्मा औरंग्याचा रक्तपिपासू चेहरा महाराष्ट्रासमोर आला होताच. परिणामी, हिंदूंमध्ये एक तीव्र असंतोषही खदखदत होता. त्यात आझमीच्या बेताल विधानाने हिंदू अधिकच खवळला. आपल्या शंभूराजांना हालहाल करून मृत्यूदाढेत ढकलणार्या औरंग्याची कबर हवीच कशासाठी, म्हणून हिंदुत्ववादी संघटना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. दि. १७ मार्च रोजी हिंदुत्ववादी संघटनेच्या नागपुरातील आंदोलनावर धर्मांध मुसलमानांकडून प्रचंड दगडफेक, जाळपोळ करून मुद्दाम दंगल भडकविण्यात आली. हिंदूंना पद्धतशीरपणे लक्ष्य करून त्यांची घरे फोडण्यात आली, गाड्या जाळण्यात आल्या. दंगलीनंतर अवघ्या काही तासांतच ५०० हून अधिक धर्मांधांना एकत्र करून हिंसाचार घडविल्याप्रकरणी, ‘मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पक्षा’च्या फहीम खानला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काल त्याच्या नागपूरमधील घरावर अपेक्षेप्रमाणे बुलडोझरही फिरला.
हिंदूंच्या संपत्तीवर दंगलीच्या आड जीवघेणे हल्ला करणार्या फहीमचेही घर जमीनदोस्त झाले. एकटा फहीमच नाही, तर अशा १०० हून अधिक धर्मांधांना पोलिसांनी आजवर ताब्यात घेतले आहेच. ३८ वर्षीय फहीम खान हा सायकल दुरुस्ती करणार्याचा मुलगा आणि पेशाने बुरखा विक्रेता. पण, हाच धर्मांध फहीम केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत रिंगणात होता. फक्त एक हजार मते कशीबशी त्याला पदरात पाडता आली. पण, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीपासूनच धार्मिक मुद्द्यांवर आंदोलने करणे, भडकाऊ विधाने देणे यांसारखे गुन्हे फहीमवर दाखल होतेच. आताची नागपूर दंगलही याच फहीमने भडकवली आणि नागपुरात हैदोस घातला. त्यामुळे अशा औरंग्यांच्या पिल्लावळींना वेचून सरकारने गजाआड केले ते योग्यच. त्यांना आता जन्माची अद्दल घडेलच, पण यानिमित्ताने अशा धर्मांध मुस्लीम मानसिकतेलाही लगाम घालण्याची वेळ आली आहे.
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीनिमित्त जी चर्चा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे, त्याला दिवसेंदिवस निरनिराळी वळणे लागत आहेत. यात तीन पक्ष आहेत. पहिला पक्षकार म्हणजे, धर्माभिमानी हिंदू आणि दुसरा पक्षकार म्हणजे खिलजी, घोरी व औरंगजेबाला स्वतःचे आदर्श मानणारे धर्मांध मुसलमान, तर तिसरा पक्षकार आहे, मतांसाठी अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुरवाळणार्या बुणग्यांचा. मजेशीर गोष्ट म्हणजे, सर्वाधिक कलकला हा याच मंडळींचा सुरू आहे. धर्मांध मुसलमानांची तळी उचलण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. पहिला पक्ष हा शिवमुद्रेतील प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे विस्तारतोच आहे. हिंदूंच्या न्याय्य अस्मितेच्या मागण्यांसाठी हा पक्ष आग्रही आहे. प्रसंगी आक्रमक होण्याचीही त्याची तयारी आहे.
शहाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे या तिन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये दिसणारा एक समान धागा म्हणजे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे व ते टिकण्याचे मंगल स्वप्न! या स्वप्नांच्या आड कोण आले असतील, तर ते होते आदिलशहा, कुतुबशहा व मुघल. शहाजीराजेंवर दख्खनच्या भूमीतून बाहेर जाण्यास दबाव टाकणारे हेच लोक होते.एरवी परस्परांच्या उरावर बसणारे हे लोक शहाजीराजे, राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची महत्त्वाकांक्षा समजले व त्यांनी शहाजीराजांना दक्षिणेकडे जायला भाग पाडले. राजकीय कारणांस्तव शहाजीराजे दक्षिणेत गेले. मात्र, राजमाता जिजाऊंनी हा वसा सोडला नाही. धर्मांध इस्लामी राजवटींचा प्रखर दाह सहन करुनही, छत्रपती शिवराय सिंहासनाधिष्ठित झाले व यादवांच्या काळात अस्ताला गेलेल्या हिंदू साम्राज्याचा पुन्हा उदय झाला. पुढचा इतिहास सगळ्यांना ठावूक आहेच. पानिपत व पानिपतानंतरही मराठ्यांनी हिंदूंचे अखिल भारतीय राजकारण करण्याची मनीषा सोडली नाही. याची प्रेरणाच शिव-शंभू होते. हाच महाराष्ट्राचा, किंबहुना या देशाचा खरा इतिहास आहे. मात्र, हा इतिहास मुस्लीम मते मिळविण्याच्या आड येतो. मग हा इतिहास बोथट केला जातो.
आधी उल्लेखलेला घोरी, खिलजी व औरंगजेबाला आदर्श मानणार्या मुसलमानांचा व मतासाठी कुठलीही लाचारी पत्करणार्या बुणग्यांचा इथे संकर होतो. यातून निरनिराळे वाद निर्माण केले जातात व पद्धतशीरपणे चालवले जातात. ‘छावा’ चित्रपटाने हिंदू चेतना जागृत केली व औरंगजेबाचे विकृत, क्रूर, धर्मवेडे रूप महाराष्ट्राला दाखविले. साहजिकच या तिन्ही पक्षांमध्ये या चित्रपटाची प्रतिक्रिया उमटली. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनप्रसंगात औरंगजेब धुसर करून, तिथे अनाजीपंतांचे पात्रच पुन्हा पुन्हा रंगवून दाखविले गेले. खरे तर छत्रपतींच्या घरातला तो एक दुर्दैवी गृहकलह होता. मात्र, औरंगजेबापेक्षा अनाजीपंत रंगवण्यात रस असल्यामुळे व महाराष्ट्रात ब्राह्मणविरोधी आशयनिर्मिती करण्याचे फायदे दिसत असल्यामुळेच असे केले गेले. महाराष्ट्राच्या संघर्षशील, देदीप्यमान इतिहासाची ही अशी मोडतोड वारंवार सुरू असते.
मग मूळ मुद्दा हा येतो की, उरलेले दोन पक्षकार हिंदूंच्या मानभंगाची पर्वा का करीत नाही? भारतात सध्या असलेले मुसलमान हे काही काबूल-कंदहारवरून आलेले नाहीत. कधीकाळी ते बिगर इस्लामीच होते. इंडोनेशियातील मुसलमान स्वत:ला सांस्कृतिकदृष्ट्या कोण समजतात? याचा शोध भारतीय मुस्लिमांनी घ्यावा. सुकर्णो, सुहार्तो ही नावे तिथे मुलांना का दिली जातात? मलेशियातील पदपथांवर धोक्याच्या सूचना देण्यासाठी संस्कृतचा वापर का केला जातो? याचे सहज उत्तर म्हणजे, ही मंडळी आजही स्वत:ला सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूच मानतात. भारतात मात्र मुसलमानांचे दोन गट दिसतात. पहिला आहे, औरंगजेबाला स्वत:चे आदर्श मानून झाकिर नाईकसारख्यांचा अनुनय करणार्यांचा व दुसरा आहे, गप्प राहून सगळ्यांतले लाभार्थी असणार्यांचा. यांचे गप्प असणे म्हणजेच धर्मांध मुसलमानांना त्यांची मूकसंमती असल्याचे वाटते.
स्वत:ला तटस्थ, सेक्युलर मात्र आपला धर्म वापरून राज्यसभा वगैरे पदरात पाडणारे तथाकथित मुसलमानही आपल्याकडे आहेत. यात नटनट्या आहेत, गीतकार, लेखक आहेत, कलावंतही आहेत. यातल्या काहींना भारतात अधूनमधून असुरक्षित असल्याचा भासही होत असतो. मात्र, त्यांच्या धर्मबंधूंच्या मोहल्ल्यांच्या शेजारी हिंदू वस्त्यांमधील लोक कसे जगत असतील, याचा विचार ही मंडळी कधीच करीत नाही. यात दिवसरात्र वाजणारे भोंगे आहेत, हिंदूंना पवित्र असणार्या गाईसह इतर जनावरांचे दिले जाणारे बळी आहेत, रस्त्यावरून निघणारे हिंसक मोर्चे आहेत. मात्र, यावर ही सगळी मंडळी मूग गिळून गप्प असतात. वर उल्लेखलेल्या तिसर्या पक्षाचे लोक, यांच्यासाठी व्यासपीठे तयार करतात आणि तिथे येऊन हे लोक ‘गंगाजमुनी तहजीब’चे धडे हिंदूंना द्यायला लागतात. या नद्यांच्या भानगडीत नर्मदा, गंगा, यमुना आणि अटक नदीच्या पलीकडे जाऊनही भगवा फडकविणारे मराठे आड येत असतात. औरंगजेबाचे उद्दातीकरण हे त्याचसाठी चालू असते.
आता तर औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद टाळून अनेक विषयांना फाटे फोडण्याचे उद्योग सुरू केले गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाची धार बोथट करण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. सातवाहनांच्या ‘प्रतिष्ठाना’पासून यादवांच्या देवगिरीपर्यंत, यादवांच्या देवगिरीपासून ते शिवछत्रपतींच्या रायगडापर्यंत, शिवछत्रपतींच्या रायगडापासून ते अटकेपार भगवा नेणार्या पेशव्यांपर्यंत आणि पानिपतानंतरही दिल्ली ताब्यात घेऊन अखिल हिंदुस्थानचे राज्य चालविणार्या महादजी शिंद्यांपर्यंत, हा सगळाच इतिहास पराक्रमाचा, प्रेरणेचा आणि जाज्वल्य धर्माभिमानाचा आहे. या ब्रिगेडी पाखंड्यांकडून तो कितीही वेळा बोथट करण्याचा प्रयत्न केला गेला, तरी तो सूर्याप्रमाणे पुन्हा पुन्हा तेजाळून वर येतच राहणार आहे. उरतो प्रश्न मुस्लिमांचा, तर टिपू, औरंगजेब हे त्यांचे आदर्श आहेत की अब्दुल कलाम, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. उरुसानंतर दंगली करून हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. धर्मांध मुसलमान जे काही करतील, त्याचे सडेतोड उत्तर यापुढे दिले जाईलच! त्यामुळे काय करायचे, ते आता मुस्लिमांनीच ठरवावे.