पोलिसांत तक्रार करण्यास गेलेल्या विहिंप कार्यकर्त्यावर कट्टरपंथींची दगडफेक
25-Mar-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Gomas Found in Nagpada) राज्यात गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असतानाही काही ठिकाणी अवैध गौ हत्या व गौ तस्करीचे प्रमाण अद्याप सुरूच आहे. गोमांसने भरलेला एक टेम्पो रविवार, दि. २३ मार्च रोजी जे. जे. ब्रीज, उत्तर वाहीनी, चौथी पीरखान स्ट्रीट कॉर्नर, जे. जे. ब्रीज उतरन, नागपाडा येथे आढळून आला. सदर प्रकरणी रियाज अहमद साकीर अहमद खान व परवेझ अहमद साकीर अहमद खान यांना अटक करण्यात आली असून टेम्पोच्या मालक व चालकाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
गोमांसने भरलेल्या पांढऱ्या रंगाच्या टेम्पोसंदर्भात एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याबबात तपास केला असता, सदर गोमास अंदाजे २०० किलो वजनाचे असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ अन्वये कलम ३२५ अंतर्गत व मोटरवाहन अधिनियम, १९८८ अन्वये कलम ६६(१) अंतर्गत नागपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोतस्करी विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर दगडफेक
नागपाडा परिसरात सापडलेली गोमांसची गाडी सर जे.जे. मार्ग परिसरातून आल्याने विश्व हिंदू परिषदेचे मुंबई शहर विभाग मंत्री राजीव चौबे सर जे.जे. मार्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याकरीता गेले. तेव्हा वरिष्ठ पोलीन निरीक्षक यांचे दालनात बैठक सुरु असल्याने त्यांनी पोलीस स्थानकाच्या बाहेर गोतस्करी विरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. त्याचवेळी एका अज्ञात इसमाने ५० ते ६० जणांचा जमाव एकत्र करत गोतस्करीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी व दगडफेक करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ अन्वये कलम १२५, ३०२, १८९(२), १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.