रामनवमीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे दादरमध्ये!

25 Mar 2025 15:10:15

Dattatray Hosbale in Mumbai

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale in Mumbai)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्ताने गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती, मुंबई महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता राजा शिवाजी विद्यालय प्रांगण, दादर (पूर्व) येथे सदर कार्यक्रम होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. त्यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयराजे होळकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Powered By Sangraha 9.0