ब्रेकिंग! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

    24-Mar-2025
Total Views |
 
Prashant Koratkar Arrest
 
 
मुंबई : (Prashant Koratkar Arrest in Telangana)प्रशांत कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आल्याची माहिती माध्यामांमधून समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. तसेच शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता असा दावा देखील त्याने केला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. आज अखेर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.