रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांवर होणार कारवाई!

24 Mar 2025 17:56:54

action against namaz on road

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (action against namaz on road) 
उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ईद-उल-फितर संदर्भात पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रस्त्यावर नमाज पडण्यावर पूर्णतः बंदी असेल, असे स्पष्ट शब्दांत त्यामध्ये म्हटले आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड फ्रायडे आणि ईद-उल-फित्र सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील ६८ ईदगाह आणि १९५ मशिदी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ईदच्या संदर्भात कोणतीही नवीन परंपरा स्वीकारली जाणार नाही, त्याचबरोबर रस्त्यावर नमाज अदा करता येणार नाही. तसेच परंपरेबाहेरील कार्यक्रमांचे आयोजन केल्यास संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल.

संवेदनशील आणि संमिश्र भागांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0