मोठी घोषणा! रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार!

24 Mar 2025 19:32:32
 
Yogi Adityanath
 
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आगामी सणांच्या दृष्टीकोनातून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून रविवारी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आता ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा विकास महोत्सव आयोजित करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक असलेले निर्देश दिले आहेत. अशातच आता लखनऊ मलिहाबाद महिला हत्यांकांड प्रकरणानंतर रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. 
 
अशातच ते पुढे म्हणाले की, अल्पवयीन युवकांनी वाहन चालवणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याच्याराविरोधात कारवाईवर सुनिश्चिती करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात स्थापना करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.
 
अशातच योगी आदित्यनाथ म्हणाले की, येत्या काळात चैत्र नवरात्र, रामनवमी, ईद-उल-फित्र, बैसाखी सारखे सण फार महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या १० वर्षात केंद्र सरकारने आणि गेल्या ८ वर्षांत राज्यात सर्व धर्म आणि समुदायाचे सण शांततेच्या वातावरणात साजरे केले जातात. हा नियम शिस्तप्रिय पद्धतीने पुढेही कायम ठेवावा लागेल. परंपरेविरूद्ध काहीही करू नये. अराजकता पसरवणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0