मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramdas Athawale on Aurangzeb Tomb) "औरंगजेबाची कबर हटवण्याने कोणताही तोडगा निघणार नाही. त्याऐवजी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारा"; असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. डेहराडून येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी औरंग्याच्या कबरीवरून होत असलेल्या वादात आपली भूमिका मांडली आहे.
हे वाचलंत का? : रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांवर होणार कारवाई!
राज्यातील मुस्लिम बांधवांना आवाहन करत ते म्हणाले, कोणीही औरंगजेबाशी आपला संबंध जोडू नका. भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाचे वंशज नाही, त्यांचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. औरंगजेबाची कबर काढून न टाकता, छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारता येईल का, याचा विचार करावा. आपल्याला संभाजी महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जायचे आहे.