नवी दिल्ली : भारतातील उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत. २०२४ च्या उद्योगक्षेत्राशी संबंधित प्रसिध्द झालेल्या अहवालानुसार उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे विलिनीकरण घडून आले आहे. २०२४ या एकाच वर्षात यात तब्बल २६.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातून भारतात खासगी गुंतवणुकीचा कलही बदलतोय असे दिसत आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात विलिनीकरणाचे तब्बल ३,१०३ करार झाले, २०२४ मध्ये २५९८ करार झाले होते.
भारतीय खासगी क्षेत्रातील गुंतवणुक मंदावल्यामुळे गुंतवणुकदार अशा प्रकारच्या पर्यांयांचा गांभीर्याने विचार करत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते यामुळे दोन फायदे होतात. पहिला म्हणजे गुंतवणुकीतील धोका कमी होतो, आणि व्यवसाय विस्तारासाठीही फायदा होतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात झालेले क्वालिटी केअर आणि अॅस्टर डीएम हेल्थकेअर, यांच्यात झालेला विलिनीकरणाचा करार हा या वर्षातील सर्वात मोठा विलिनीकरणाचा करार होता. याआधी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यात झालेला विलिनीकरणाचा करार हा सर्वात मोठा करार होता.
भारत सातत्याने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक राखतोय. त्यामुळे भारतातील या अशा पर्यायांमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडूनही पसंती मिळत आहे. भारतात वर उल्लेख केलेल्या विलिनीकरणांपेक्षाही अजून काही कंपन्यांमध्ये असे करार झाले आहेत. जसे की रिलायन्स, डिस्नी यांच्यात झालेला करार, एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट यांच्यात झालेला करार यांतून हेच दिसून येते. तज्ज्ञांच्या मते भारतात या विलिनीकरणांमध्ये अजून वैविध्य दिसेल. यातून भागधारकांना, तसेच कंपनी संस्थापकांना यातून फायदा होतो आहे. भविष्यात मोठ्या रकमेचे करार आपल्याला बघायला मिळतील असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.