मुंबई : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, दि. २६ मार्च रोजी होणार असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दि. २४ मार्च रोजी विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर केली. या पदासाठी उमेदवारी भरण्याची मुदत मंगळवारी दि. २५ मार्च असून, बुधावरी २६ मार्च सकाळी ११ पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मिळून विरोधी पक्ष नेता निवडीइतके संख्याबळ नसताना विरोधी पक्ष हा उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊ शकते.