विना परवाना आधारकार्ड केंद्रात बनावट आधार अपडेट, पोलिसांनी छापा टाकत घटनेचा केला गौप्यस्फोट

24 Mar 2025 15:22:54

Fake Aadhaar update
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुरादाबादेतील बिलानी नगरमध्चे अवैधपणे सुरू असणाऱ्या एका आधारकार्ड केंद्रात परवान्याशिवाय आधारकार्ड अपडेट केले जात होते. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. बनावट आधारकार्ड केंद्र सील करण्यात आले. .या संदर्भात, पोलिसांनी ऑपरेटरविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे, त्याला अटकही करण्यात आली आहे आणि संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे, ही घटना साहू कुंजमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शहरातील साहू कुंज परिसरात एका आधार केंद्राने बनावट आधारकारर्ड बनवले होते. ज्यात परवान्याशिवा. आधार कार्ड अपडेट केले जात होते, रविवारी, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ऑपरेटलाही अटक करण्यात आली आहे, दरम्यान, ऑपरेटरकडून आधारकार्ड केंद्र चालवण्यासाठी कागदपत्रे मागितली गेली, परंतु तो कागदपत्रे दाखवू शकला नाही, नंतर, पोलिसांनी नायब तहसीलदारांना घटनास्थळी बोलावण्यात आले आणि आधारकार्ड केंद्र सील केले. यावेळी घटनास्थळावरून बायोमॅट्रिक मशीन आणि इतर कागदपत्रे सापडली. पोलिसांनी ऑपरेटरविरूद्ध गुन्हाल दाखल करत पुढील तपासास सुरूवात केली आहे.
 
 
 
अशातच आता कोतवाली पोलीस उपनिरीक्षक अनुज सिंह यांनी दखल करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले की, साहू कुंजमध्ये सुरू असणाऱ्या आधारकार्ड केंद्रात बनावट आधारकार्ड बनवले गेले असून अपडेटही केले जाते अशी माहिती त्यांना मिळाली होती.
 
दरम्यान, आधारकार्ड केंद्रासाठी कोणताही एक परवाना नाही, पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अनुज सिग यांच्या तक्रारीवरून संबंधित अवैधपणे आधारकार्ड बनवणाऱ्या वाजित मलिकविरूद्ध संबंधित गुन्ह्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0