क्रिकेट विश्वात शोक! माजी क्रिकेट कर्णधारास हृदयविकाराचा तीव्र झटका
24-Mar-2025
Total Views |
ढाका (Tamim Iqbal Heart Attacked) : बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल यांना ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना राजधानी ढाकाच्या बाहेरील सावरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक माध्यमांनी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे. त्यांना आरामाची आवश्यकता असल्याची माहिती दिली आहे.
त्यांची स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. ज्याठिकाणी हृदयविकार झाल्याचा संशय होता. त्याला ढाक्याला नेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, परंतु हॅलिपॅडकडे जाताना त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्याला तातडीने परत बोलावण्यात आले आहे. नंतर वैद्यकीय अहवालामध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे स्पष्ठ झाले, असे बांगलादेशात क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशिष चौधरी यांनी सांगितले आहे.
आपल्या सर्वांसाठी ही घडलेली घटना म्हणजे एक कठीण काळ असून एका निरीक्षणाखाली आहे. वैद्यकीय पथक त्याच्या पुनप्राप्तीसाठी आवश्यक असेल ते प्रयत्न करता येणार आहेत, असे चौधरी म्हणाले आहेत.
Tamim Iqbal suffered a heart attack while playing a game in the ongoing Dhaka Premier League, reports @a_atifazam.
तमीम सावर मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील सामना खेळत असताना त्याला छातीत दुखू लागले. सुरूवातीला अधिकाऱ्यांनी त्याला हॅलिकॉप्टरने ढाकात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आता त्याला बीकेएसपी मैदानावर विमानाने नेणे शक्य झाले नाही आणि त्याला फजिलातुन्नेसा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
त्यानंतर डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिल्यानंतर सांगितले की, तो गंभीर अवस्थेत परतला असून त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याची लक्षणे आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही अँजिओप्लास्टी केली. वैद्यकीय प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. सध्या तमीम हा डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. अशातच त्याच्यावर डॉक्टरांच्या समन्वयामुळे तमीम इक्बालवर लवकर उपचार झाले. जानेवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तमिम इकबाल हा स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत आहे आणि समालोचन करत आहेत.