नवी दिल्ली (Arvind Kejriwal) : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आप सरकारला भाजपचे पराभवाची धुळ चारली आहे. त्यानंतर आता पंजाबचा नंबर असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी १३ मार्च रोजी शहीद जवानांच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर बेताल आणि निरर्थक टीका केल्या आहेत. भाजप सरकार ही ब्रिटीशांहूनही वाईट असल्याचे बेताल वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी तुरूंगात राहण्याचा अनुभव उपस्थितांना संबोधित केला आणि आपली तुलना इतर शहिदांशी केली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली आहे. अशातच आता केजरीवाल यांनी यावेळी तुरूंगवासाचा अनुभास सांगत आपली तुलना शहिदांसोबत केली आहे. त्यांनी भगत सिंह यांच्या पत्राची आठवण सांगितली की, ब्रिटीश सरकारच्या काळात पत्राचाराची स्वातंत्र्यता होती, मात्र मला तुरूंगात कैद करूनही पत्र लिहून दिले नाही, असे बेताल वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी सांगितले की, भगत सिंह हे केवळ इंग्रजच नाहीतर समाजात बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होते. मात्र, आजचे शासक संबंधित विचारधारेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा निरर्थक दावा त्यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या विकासाला आणि दिल्लीतील यमुना नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी अकार्यक्षम असल्याचे पुन्हा एकदा नव्याने दिल्ली निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले आहे.