तृतीयपंथीयांनी पैसे देण्यास नकार देणाऱ्या निष्पाप आदर्शला दिले रेल्वेबाहेर फेकून, रेल्वे पोलिसांनी शोधून काढला मृतदेह

    23-Mar-2025
Total Views |
 
Adarsh Murder
 
मध्य प्रदेश : रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना आरेरावी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणाऱ्या तृतीयपंथींनी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ-विदिश बासोदादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाची हत्या करत रेल्वेतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला असून कुटुंबियांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
 
विदिशाच्या अयोध्या वस्तीत वास्तव्य करणाऱ्या २३ वर्षीटय आदर्श विश्वकर्मा या तरुणाला तृतीयपंथीयांकडून रेल्वेत बेदम मारहाण केली. १३ मार्च रोजी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. तृतीयपंथीयांनी आदर्शला रेल्वेत केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की तृतीयपंथी आदर्शच्या अंगावर उड्या मारताना दिसत आहेत.
 
 
 
ही घटना घडून सात दिवसांचा कालावधी उलटटून गेला आहे. तरी अशातच पोलिसांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. आदर्श भोपाळमध्ये इलेक्ट्रिकलच्या दुकानात काम करायचा. तो रेल्वेने दुकानावर ये-जा करायचा. १३ मार्चच्या रात्रीच तो भोपाळहून गोंडवाना एक्सप्रेसने घरी येत होता. त्यावेळी भोपाळहून रेल्वेत चढलेल्या तृतीयपंथीयांनी सलामकपूर सांचीजवळ त्याच्याकडे पैसे मागण्यात आले होते. त्यावेळी आदर्शने पैसे देण्यास नकार दिला होता. तेव्हा तृतीयपंथीयांना थेट त्याच्या खिशात हात घातला. त्यावेळी आदर्शने तृतीयपंथीयाने केलेल्या या कृत्याचा विरोध केला. त्यावेळी संबंधित असलेल्या रेल्वे डब्यातील कोचमधील तृतीयपंथीयांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारहाण केली.
 
मारहाण करताना आर्शदचे वाईट हाल केले. त्यानंतर त्याचे कपडे फाडण्यात आले होते. यावेळी काही तृतीयपंथीयांनी त्याच्या अंगावर उड्या मारल्या. त्याच्या तोंडावर पोटावर लाथा मारण्यात आल्या होत्या. त्यावेळी सभोवतालचे प्रवासी पोरगं मरून जाईल अशी आरडाओरडा करत होते. त्यानंतर तृतीयपंथीयांनी त्याला गंजबासोडा येथे फेकून दिले होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी गंजबासोडा येथे त्याचा मृतदेह सापडला होता.