जयंत पाटील पक्षात अस्वस्थ! लवकरच...; मंत्री संजय शिरसाट यांचा दावा
23-Mar-2025
Total Views |
अहिल्यानगर : जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहेत. लवकरच काहीतरी धक्का देणारी घटना आपल्यासमोर येईल, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात होते. यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय शिरसाट म्हणाले की, "अजित पवार आणि जयंत पाटील यांनी अनेक वर्षे एकाच पक्षात काम केले असल्याने त्यांच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती असतात. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण आहे. कितीही नाकारले तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्या आहेत. जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कदाचित त्यासंदर्भात त्यांचे काही बोलणे झाले असेल. या अधिवेशनाच्या काळात काहीतरी धक्का देणारी घटना आपल्यासमोर येईल," असा दावा त्यांनी केला.
संजय राऊतांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "संजय राऊतांच्या बोलण्याला कधीही महत्व देऊ नका. ते जे बोलतात त्याचे सगळे उलटे घडते. बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नका असे सांगितले असतानाही हे गद्दार लोक त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे त्यांना आम्ही महत्व देत नाही," अशी टीकाही मंत्री संजय शिरसाट यांनी केली.