एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे पारितोषिक!

23 Mar 2025 11:38:58

SNDT Womens University 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाला १ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १२ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा पुरस्कार देण्यात आला.
 
गुजराती विभागाच्या कार्याची दखल
 
गुजराती भाषा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी दरवर्षी विविध पुरस्कार योजना राबवते. या योजनेअंतर्गत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विभागाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची आणि सांस्कृतिक योगदानाची पावती आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0