भुवनेश्वर कुमार आरसीबीमध्ये न खेळण्याचे कारण आले समोर

23 Mar 2025 15:59:48
 
Bhuvneshwar Kumar
 
कोलकाता : टाटा आयपीएल २०२५ चा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. आरसीबीने ईडन गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेकी जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२५ चा हंगाम सुरू झाला आहे. आरसीबी चाहत्यांना धक्का बसला आहे, संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात भुवनेश्वर कुमार आरसीबीमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये अनुपस्थि होता. आयपीएल २०२५ च्या लिलावात १०.७५ कोटी रुपयांच्या लिलावात विकत घेतलेला भुवी कुठे गायब झाला? असा अनेक चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रसिक सलाम दार आणि यश दयाल यांनी हेझलवूडसोबत आरसीबीसाठी सराव केला.
 
या सामन्यात भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्याने संधी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो आरसीबीमध्ये खेळू शकला नाही. भुवनेश्वर कुमार हा एक वेगवान गोलंदाज असल्याने त्याचा फायदा ईडन गार्डवर झाला असता. कारण ईडन गार्डनची खेळपट्टी ही वेगवान खेळाडूंसाठी पोषक आहे.
 
 
 
आगामी सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमार खेळणार की नाही? असा प्रश्न क्रीकेट रसिकांच्या मनात आहे. या संबंधित माहितीची अपडेट लवकरच येत्या सामन्यातून समोर येईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यात त्यांच्या प्रमुख गोलंदाजाच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारत आरसीबीचे चाहते सोशल मीडियावर सक्रिय होते.
 
आरसीबी प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (क), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल
 
इम्पॅक्ट सब : देवदत्त पडिक्कल, अभिनंदन सिंग, मनोज भंडागे, रोमॅरियो शेफर्ड, स्वप्नील सिंग
 
Powered By Sangraha 9.0