तिरूपती मंदिरात हिंदू कर्मचारीच, चंद्रबाबा नायडू यांचा निर्णय

    23-Mar-2025
Total Views |
 
Tirupati temple
 
अमरावती : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तिरूमालातील भगवान व्यंकटेश मंदिरात केवळ हिंदूंनाच काम करण्याची मूभा आहे. जे कर्मचारी इतर धर्मांमध्ये आस्था शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल. या संबंधित विषयी माहिती त्यांनी त्यांच्या नातीच्या वाढदिवशी दिली. 
 
सांगण्यात येत आहे की, काही महिन्यांआधी तिरूमाला तिरूपती देवस्थानम टीटीडी बोर्डाने १८ कर्मचाऱ्यांना अहिंदूंच्या कार्यात सहभागी झाल्याबाबत १८ कर्मचाऱ्यांची बदली केली होती. नायडू म्हणाले की, जर ख्रिश्चन किंवा मुस्लिम बंधू भगिनींना हिंदूंसोबत काम करायचे नसेल तर त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाईल.
 
नायडू यांनी सांगितले की, तिरूपतीत ३५ एकर जमिनीवर हॉटेल बनवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. ही जमीन मागील काही वर्षे काँग्रेस सरकारने देवलोक, एमआरकेआर आणि मुमताज बिल्डर्सला दिली होती. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी उचललेले हे पाऊल मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आहे. फाईव्ह स्टार हॉटेलविरोधात लोकांनी विरोध दर्शवला होता. या व्यतिरिक्त त्यांनी सांगितले की, राज्यातील काही गावांतील लोक आपल्या गावात व्यंकटेश्वराचे मंदिर व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी एका ट्रस्टही बनवण्यात आले होते.
 
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देशभरातील राजधान्यांमध्ये व्यंकटेश्वर मंदिर बनवण्याची योजना आखली होती. त्यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांना एक चिठ्ठी लिहिण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात १८ कर्मचाऱ्यांमध्ये ६ संबंधित शाळांच्या शिक्षिका होत्या. ज्यात एक वेल्फेअर, असिस्टंट एग्जिक्युटीव्ह ऑफिसर, असिस्टंट टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल), हॉस्टर वर्कर, दोन इलेक्ट्रिशन आणि दोन नर्सचा त्यात समावेश आहे.