नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील दंगलीवरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. नुकत्याच नागपूरातील झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून होणार आहे.
त्यानंतर पुढे लिहिले की, जेवढे नुकसान झाले त्या नुकसानीची किंमत त्यांना वसून करण्यात येईल. त्यांनी जर पैसे दिले नाहीतर त्यांची संपत्ती विकली जाईल. तसेच त्यांनी बुलडोझरने कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात आपल्या पद्धतीने कारवाई केली जाणार असे त्यांनी लिहिले होते. आवश्यक ठिकाणी बुलडोझर चालवा, कोणालाही सोडले जाणार नाही.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की. आजपर्यंत १०४ आरोपींची ओळख झाली असून ज्यात ९२ जणांना अटक करण्यात आली आहे. तावडीत सापडणाऱ्यांमध्ये १२ अव्पवयीन युवकांचाही समावेश आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये झालेल्या दंगलीबाबत ज्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केल्या आहेत त्यांच्या पोस्ट हटवण्यात आल्या होत्या. यामध्ये मालेगावचेही कनेक्शन आहे.
मुख्यमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या छेडछाडीच्या आरोपांवर सांगितले की, महिला पोलीस अधिकाऱ्याची छेड नाहीतर त्यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी दावा केला की, नागपूर हे ८० % नागपूर शांत असून आता कर्फ्यू हटवण्यात येत आहे. ३० मार्च रोजी नरेंद्र मोदी हे नागपूरात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.