ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
22-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : ज्येष्ठ हिंदी साहित्यीक आणि कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गेल्या ५० वर्षांपासून साहित्यक्षेत्रात स्वताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांना ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगढ येथील राजनंदगाव येथे झाला. १९७१ साली त्यांचा पहिला कविता संग्रह "लगभग जिंदगी' प्रकाशित झाला.
नौकर की कमीज ही त्यांची कादंबरी हिंदी साहित्य वर्तुळात प्रचंड गाजली. विनोद कुमार शुक्ल यांना त्यांच्या कादंबरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. रजा पुरस्कार, गजानान माधव मुक्तिबोध पुरस्कार तसेच त्यांच्या ' दीवार में एक खिडकी रहती थी' या कादंबरीसाठी साहित्या अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. त्याच बरोबर विनोद कुमार शुक्ल आशिया खंडातील एकमेव लेखक ज्यांना मानाचा नाबोकोव्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विनोद कुमार शुक्ल आपल्या लेखनातील जादुई वास्तववादासाठी ओळखले जातात. भाषेचा वेगळा लहेजा, तसेच आपल्या शब्दातून चितारलेली भावनिक खोली यामुळे त्यांच्या लेखनाचे चाहते जगभरात आहेत.