वास्तू संग्रहालयातील शिक्षण थेट विद्यार्थ्यांच्या दारी!

    22-Mar-2025
Total Views |

Museum
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि कला यांसारख्या विषयांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी च्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

शालेय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) सहकार्याने, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २० शाळांमधून ३५ शिक्षक सहभागी झाले होते. संवादात्मक कार्यशाळा, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील सत्रे आणि प्रत्यक्ष क्रियाकलापांच्या माध्यमातून शिक्षकांना संग्रहालयातील वस्तू आणि सांस्कृतिक वारसा स्थळे यांचा शिक्षणात कशाप्रकारे उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना यावेळी देण्यात आले.

या प्रशिक्षणाचा भाग म्हणून शिक्षकांनी भाऊ दाजी लाड संग्रहालय, नेहरू विज्ञान केंद्र आणि एलिफंटा लेणी या स्थळांना भेट दिली. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 शी सुसंगत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संग्रहालयातील अभ्यासाची उत्सुकता, तर्कशुद्ध विचार आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

सदर कार्यक्रमाविषयी माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाचे संचालक सब्यसाची मुखर्जी, म्हणाले की " या उपक्रमाद्वारे शिक्षकांना, त्यांची शिक्षण पद्धती अधिक आकर्षक आणि सर्जनशील होण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय भारतीय शिक्षणाला अधिक सुलभ आणि आकर्षक बनवण्यासाठी सतत कार्यरत आहे."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथीयांनी पैसे देण्यास नकार देणाऱ्या निष्पाप आदर्शला दिले रेल्वेबाहेर फेकून, रेल्वे पोलिसांनी शोधून काढला मृतदेह

तृतीयपंथीयांनी पैसे देण्यास नकार देणाऱ्या निष्पाप आदर्शला दिले रेल्वेबाहेर फेकून, रेल्वे पोलिसांनी शोधून काढला मृतदेह

Adarsh Murder रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना आरेरावी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणाऱ्या तृतीयपंथींनी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ-विदिश बासोदादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाची हत्या करत रेल्वेतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला असून कुटुंबियांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे...