संजय राऊत मनोरुग्ण झालेत! खासदार नारायण राणेंचा घणाघात
22-Mar-2025
Total Views |
मुंबई : संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. त्यांना मेडिकल चेकअप करावे लागेल, असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत यांनी मनोरुग्ण सरकार असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. यावर उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले की, "संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. त्यांना मेडिकल चेकअप करावे लागेल. ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना पत्रकार समजू नका. आपल्याला कुठे चान्स मिळतो का याची वाट ते पाहत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "उबाठाचे दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. आता २० आमदार आहेत. काही दिवसांत १० वर येतील. पुढच्या निवडणूकीपर्यंत फक्त नामधारी १-२ आमदार असतील," असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंनी आपल्याला दोनवेळा फोन केल्याचा गौप्यस्फोटही केला.