नागपूर हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट! आणखी दोघांना अटक; सोशल मीडियावर भडकाऊ व्हिडीओ टाकल्याचा आरोप

    22-Mar-2025
Total Views |
 
Hamid Engineer Nagpur Violence
 
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हमीद इंजिनयर हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्याध्यक्ष आहे. त्याच्यावर नागपूरमधील हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे. यासोबतच पोलिसांनी युट्यूबर मोहम्मद सहजाद खान यालादेखील अटक केली असून त्याच्यावर व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या दोघांनीही नागपूरात हिंसाचार घडवण्याचा कट रचला असून त्यासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचाराचा कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
हे वाचलंत का? -  पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंनीच निरोप...; चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट
 
दरम्यान, नागपूर घटनेत आतापर्यंत १०५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर काही कट्टरपंथींयांकडून नागपूरात हिंसाचार करण्यात आला. या प्रकरणात फहीम खान हा मास्टरमाईंड असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे.