घराबाहेर तुळस, देव देवतांची नावे असणाऱ्या वाहनांवर जाणुनबुजून दगडफेक; पत्रकाराच्या ग्राऊंड रिपोर्टमधून नागपूर दंगलीचं दूध का दूध पाणी का पाणी

    22-Mar-2025
Total Views |

नागपूर दंगल
 
नागपूर : नागपूर दंगल  १७ मार्च २०२५ रोजी घडली होती. याच दंगलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आजही त्याचे विपरित पडसाद कायम असल्याचे दिसून येत आहेत. कट्टरपंथी जमावाने तुळस असणाऱ्या घरांवर हल्ला केला. देव देवतांच्या मूर्तींवर, घरांवर, वाहनांवर हल्ला चढवण्यात आला होता. या दंगलीनंतर नागपूरात शांतता असली तरीही परिस्थिती अद्यापही परिपूर्ण निवळली नसल्याचे दिसून येत आहे. अद्यापही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. दंगली ठिकाणी काही प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी ग्राऊंड रिपोर्ट केला आहे. त्यातून कट्टरपंथींनी केलेला हल्ला जाणुनबुजून करण्यात आला अशी पोलखोल पत्रकारांनी केली आहे.
 
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्या व्हिडिओत पत्रकाराने कट्टरपंथींनी जाणुनबुजून हिंदूंच्या वाहनांवर, घरांवर हल्ले करण्यात आल्याचा पर्दाफाश केला आहे. एका महिला पत्रकाराने एका मुस्लिम व्यक्तीला विचारले की, हिंदूंच्या वाहनांना, गाड्यांना टार्गेट केले जात आहे का? त्यावर संबंधित मुस्लिम व्यक्तीने असे अजिबात नाही, हे खोटं असल्याचे उत्तर महिला पत्रकाराला दिले. त्यावर महिला पत्रकाराने दंगलीनंतर झालेले सर्व वास्तव दाखवले. काहींच्या वाहनांवर देव-देवतांची नावे लिहिण्यात आली होती नेमक्या त्याच गाड्यांना टार्गेट करण्यात आले. काही वाहनांवर बिस्मिल्लाह लिहिण्यात आले होते ती वाहने सुरक्षित होती.
 
 
तर काही हिंदू धर्मियांच्या दुकानांची घरेही जाळण्यात आली होती. या दंगलीमध्ये २० ते ४० वयोगटातील कट्टरपंथी जमाव सामिल झाला होता. अनेक वर्षे सर्वधर्म समभावाचा हिदूंनी जप केला होता. मात्र, त्याचे विपरित परिणाम हे नागपूरच्या दंगलीत दिसून आले. यावेळी औरंगजेबाच्याही घोषणा देताना जमाव दिसत होता.
 
 
 
एका प्रसारमाध्यमांशी बोलताना एका हिंदू महिलेने सांगितले की, त्यांनी तुलशीची रोपं पाहून ती फेकून दिली. त्यानंतर शिवीगाळही केली आणि प्रक्षोभक घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर एका दुसऱ्या महिलेने सांगितले की, ते हिंदूंना नागपूरात राहूण देणार नाही, असा दावा करत धमकी देत होते. त्यांनी अनेक रिक्षा चालकांना धमकी दिली होती.
 
तसेच काही गाड्यांवर पेट्रोल टाकत बॉम्ब फेकण्यात आले होते. इस्लाम धर्मात रोजा म्हणजे उपवासाला अनन्यासाधारण महत्त्व आहे. पण धर्मांधांनी उपवास सुरू असतानाच हे कृत्य केले आणि नागपूरचा एका रात्रीत चेहरामोहरा बदलण्यास धर्मांध कट्टरपंथी जबाबदार आहेत.