पनवेलमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा "स्वयं पुनर्विकासा"वर मार्गदर्शन शिबीर

    22-Mar-2025
Total Views |
 
Pravin Darekar
 
मुंबई - ( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शक व उदघाटक म्हणून भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर तर पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश बालदी, सहकारी संस्था पनवेलचे सहाय्यक निबंधक भारती काटुळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निमंत्रक पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन, नवी मुंबईचे सचिव भारत मोरे पाटील यांनी दिली. तसेच या शिबिराला सहकारातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, सहकारी संस्थांच्या सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.