पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंनीच निरोप...; चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट

    22-Mar-2025
Total Views |
 
Chitra Wagh Uddhav Thakceray
 
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्या पक्षप्रवेशासाठी निरोप पाठवला होता, असा गौप्यस्फोट आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
चित्रा वाध म्हणाल्या की, "उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता. चित्राताई एकदा येऊ भेटा. तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, असा तो निरोप होता. मी जाणे न जाणे हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. पण मी स्वत:हून गेले नव्हते तर त्यांनी मला बोलावले. त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा होते. त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडेदेखील घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, मला ठरवू द्या मी अजून विचार केलेला नाही. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते," असे त्या म्हणाल्या.
 
'ती' ईच्छा पूर्ण झाली!
 
"मिलींद नार्वेकर यांच्याकडे स्वत: उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवला होता. बाळासाहेब जिथे बसायचे त्या जागेचे दर्शन घ्यायची माझी ईच्छा होती आणि यानिमित्ताने ही एकच गोष्ट त्यावेळी चांगली झाली. हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांना विचारा," असेही चित्रा वाघ सुषमा अंधारेंना म्हणाल्या.