भाजप बिहार सेलच्या वतीने 'बिहार स्थापना दिन' साजरा!
22-Mar-2025
Total Views |
मुंबई : 'एक भारत श्रेष्ठ भारत' या कार्यक्रमांतर्गत भाजप बिहार सेलच्या वतीने शनिवार, २२ मार्च रोजी भाजप कार्यालयात 'बिहार स्थापना दिन' साजरा करण्यात आला. भाजप बिहार सेलचे मुंबई अध्यक्ष डॉ. मनोज झा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, बिहारचे माजी आमदार सचिंद्र सिंह, बिहारचे मंत्री संजय सरावगी, खासदार राजीव प्रसाद रुडी आणि खासदार मनोज तिवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी संबोधित केले.
मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरित बिहारी रहिवाशांना बिहारमधील त्यांच्या गावाशी कसे जोडता येईल यासह बिहार निवडणूका आणि सध्या विकसित होत असलेला बिहार प्रदेश यावर विस्तृतपणे संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत अंबष्ठ यांनी तर आभार प्रदर्शन चक्रधर झा यांनी केले. या कार्यक्रमाला मोहन मिश्रा, नितीश वर्मा (संयोजक, बिहार राज्य सेल), फूल सिंग, प्रद्युम्न शुक्ला, चंद्रप्रकाश मिश्रा, नीलेश झा, अभय झा, जितेंद्र झा, अवधेश पासवान, संजय वर्मा, प्रदीप साहू इत्यादींचे सहकार्य लाभले.