धारावीकरांनो, तुमचं सर्व्हेक्षण झालं का?

अद्याप सर्वेक्षण झालेले नसल्यास स्वेच्छेने पुढे या!

    21-Mar-2025
Total Views |

dharavi survey



मुंबई, दि.२१ : विशेष प्रतिनिधी 
धारावीचा कायापालट करण्यासाठी आणि धारावीकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे झोपडीधारकांचे सर्व्हेक्षण हा आहे. या सर्व्हेक्षणाला गती देण्यासाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च या तारखेपर्यंत धारावीकरांनी सर्व्हेक्षणाला येणाऱ्या टीमला कागदपत्रे सादर करावी, तसेच या सर्व्हेक्षणात सहभागी होत सहकार्य करावे असे आवाहन डीआरपीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

धारावीचा पुनर्विकास हा भारतातील सर्वांत मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. सुमारे १० लाख लोकांचे निवासस्थान असलेल्या धारावीला आधुनिक शहरी केंद्रात रूपांतरित करण्याचा हा प्रकल्प आहे. सुमारे १.५ लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून धारावीतील नागरिकांना उत्तम घरे, पायाभूत सुविधा आणि आर्थिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.अनेक आव्हानांना सामोरे जात या धारावीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी अलीकडेच सर्व धारावीकरांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून कोणीही या गृह पुनर्वसन योजनेतून वगळले जाणार नाही.

नोटीस नेमकी काय?


डीआरपी हे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक प्राधिकरण, धारावी रिडेव्हलप करण्यासाठी काम करत आहे. उत्तम भविष्यासाठी तुमचा यात सहभाग महत्त्वाचा आहे. तुमच्या घराचे सर्वेक्षण अद्याप झालेले नसल्यास स्वेच्छेने पुढे यावे आणि या परिवर्तनाचा भाग व्हावे. घरे, दुकाने आणि कारखाने या सर्वांचे नियोजन आणि विकास हे महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला अनुसरून असेल. कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ आहे. ही संधी गमावू नका. सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासाठी संपर्क 1800-268-8888 या नंबर संपर्क साधा. मेल करण्यासाठी surveydharavi@gmail.com किंवा एनएमडीपीएल, माहिम (पश्चिम), तिकीट खिडकीजवळ या पत्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व्हेक्षण पूर्ण करून घेण्याचे आवाहन डीआरपीने केले आहे.