सरकारी शाळेत शिक्षकाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन! विद्यार्थ्यांनाही करण्यात आले सामील, व्हिडिओ होतोय व्हायरल
21-Mar-2025
Total Views |
लखनऊ (Iftar party) : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील शिकारपुरच्या एका प्राथमिक शाळेत एका कट्टरपंथी शिक्षकाने इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षण अधिकारी डॉ. लक्ष्मीकांच पांडे यांनी शिक्षक इरफान नक्वीच्या संबंधित शैक्षणिक पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित इफ्तार पार्टीत विद्यार्थ्यांचा समावेश असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यानंतर संबंधित प्रकरणात शाळेने लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले.
या घटनेचा संबंधित व्हिडिओ हा बुधवारी सायंकाळी उशीरा व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमुळे शाळेत मोठ्या संख्येने लोक उपवास सोडताना दिसत आहेत. जेव्हा व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांकडे पोहोचला तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तपासादरम्यान, असे आढळून आले की, शेरकोटा शिकारपूरचा रहिवासी असून मोहम्मद शानूने मुख्यध्यापकांकडून इफ्तारची परवानगी घेतली होती आणि त्यानंतर इफ्तारचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तपासानंतर सांगण्यात आले की, विद्यापीठ, शाळा, माहविद्यालयात कोणत्याही प्रकारचे आयोजन करण्यास प्रशासनाने विरोध दर्शवला. यात आता एका शिक्षकाने इफ्तार साजरा करण्यासाठी परवानगी दिली. मात्र शैक्षणिक संस्थेत इफ्तार पार्टी करणे म्हणजे त्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन आहे. या सर्व प्रकरणानंतर इरफाना नक्वी या शिक्षकाला आपल्या पदावरून निलंबित करून हटवण्यात आले. यानंतर आता आयोजकावरही कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे.