देशद्रोहावरून केलेल्या वक्तव्याने राहुल गांधींना न्यायालयाकडून नोटीस जारी

    21-Mar-2025
Total Views |
 
Rahul Gandhi
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल न्यायालयाने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयात दाखल राहण्यासाठी नोटीस जारी केली. त्यांनी देशद्रोही वक्तव्य केले आहे. माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विरोध नाहीतर माझी लढाई ही भारताच्या राज्याविरोधात आहे. या वक्तव्याने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशद्रोह दाखवून दिला आहे. यामुळे आता न्यायालयाने त्यांना न्यायालयात दाखल होण्यासाठी एक नोटीस जारी केली आहे.
 
वकील सचिन गोयलने सांगितले की, न्यायालयामध्ये राहुल गांधींविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल केली. त्यासाठी आता न्यायालयाने या प्रकरणी ४ एप्रिल रोजी आपली हजेरी लावावी अशी नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या तारखेला न्यायालयात दाखल राहणे बंधनकारक आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली स्पष्टोक्ती त्यांनी द्यावी, असे नोटीशीत म्हटले आहे. 
 
 
 
याचिकाकर्त्या हिंदू शक्ती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सिमरन गुप्ता यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांनी १५ जानेवारी २०२ रोजी काँग्रेसच्या मुख्यालयाच्या उद्घाटनादरम्यान बेताल वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, माझी लढाई भाजप किंवा आरएसएससोबत नाही, माझी लढाई ही भारतासंदर्भात आहे, यावर गुप्ता यांचे म्हणणे आहे की, त्यांनी केलेल्या वक्तव्याने भावना दुखावल्या गेल्या आहेत.
 
सिमरनचे वकील सचिन गोयल म्हणाले की, "सिमरग गुप्ता यांनी राहुल गांधींविरोधात खासदार न्यायालयात खटला दाखल केला होता. परंतु मुख्य न्यायदंडाधिकाऱी यांनी अधिकारक्षेत्राच्या आधारावप फेटाळून लावण्यात आला. तिने संभलच्या जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी स्वत: जानेवारी रोजी न्यायालयात धाव घेतली,", असा दावा करण्यात आला.