बिहारमधील रेल्वेस्थानकाच्या कामाचे कारण सांगत हनुमंताच्या मंदिरावर हातोडा, हिंदू संघटनांकडून मुजफ्फरपूर बंदची हाक

21 Mar 2025 21:31:23
 
Hindu
 
पाटणा : बिहारमधील मुजफ्फरपूर रेल्वेस्थानकाजवळ असणाऱ्या एका हिंदू मंदिरावर स्थानिक प्रशासनाने हतोडा चालवला आहे. या निषेधार्थ आता हिंदूंनी निदर्शने दर्शवली आहेत. तसेच २१ मार्च २०२५ रोजी मुजफ्फपूर बंदची हाक दिली आहे. या बंदला आता विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला सकाळी पहाटे ६ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यावेळी कोणताही एक अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
 
१० मार्च रोजी रेल्वेनजीक असलेले हनुमान मंदिर पाडल्याने मुजफ्फूर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे, रेल्वेस्थानकाचे काम करण्यासाठी संबंधित हनुमान मंदिरामुळे अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ते मंदिर पाडण्यात आले असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याबाजूला हनुमान मंदिर बांधण्यात आले. मात्र, देवाचा अवमान झाल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक झाले. त्यानंतर संबंधित रेल्वेनजीक असलेली मशीदही पाडावी अशी मागणी केली आहे.
 
 
 
मुजफ्फरनगरमध्ये रेल्वे पोलीस आणि जिल्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील ६७ संवेदनशील ठिकाणी ६०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. कोणताही एक अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस डोळ्याततेल घालत प्रकरण हताळताना दिसत आहे.
 
या बंदमध्ये सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद अशा हिंदू संघटनांनी सहभाग घेतला आहे. यामुळे शाळा, कॉलेज, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अपत्कालीन मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दंगल, तोडफोड असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.
 
मुजफ्फरपूरमधील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागेल. कारण रेल्वेचे का सुरू असून रेल्वे बंद असल्याने कोणालाही लांबचा प्रवास करता येणार नाही. परिस्थिती लक्षात घेता प्रशासन आपली भूमिक चोखपणे पार पाडत आहे. दरम्यान वाहने सुरू करण्यासाठी अद्यापही स्थानिक प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0