महाकुंभ-राम मंदिरात जायची वेळ आल्यावर कारण देणारे इफ्तारच्या पहिल्या पंक्तीत कसे?

    21-Mar-2025
Total Views |


 Iftar Party 
 
नवी दिल्ली Iftar Party : लोकसभा निवडणुकीत सलग तीन वेळा काँग्रेसचा (Congress) पराभव झाला. मात्र आजही ते तुष्टीकरणाचे राजकारण करण्यास कोणतीही एक कसर सोडताना दिसत नाहीत. हिंदूंच्या संघर्षाचे प्रतीक असलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा आणि महाकुंभापासून दूर राहिलेले काँग्रेस नेतृत्व आता आनंदाने इफ्तारमध्ये सहभागी होत आहेत. मोहम्मद अली जिना यांनी गांधी कुटुंबाच्या प्रत्येक कृतीवर गदारोळ करणारी काँग्रेस आता इफ्तारवर मूग गिळून गप्प बसली आहे.
 
२०१४ त्या लोकसभा निवडणुकीआधी हिंदू म्हणून ओळख देणाऱ्या नेत्यांचे इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्याची छायाचित्रे सामान्य होती. हे व्होट बँकेच्या राजकारणाचे एक मोठे शस्त्र मानले जात होते. हे इफ्तार राजकारण राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले होते. २०१४ मध्ये मुस्लिम तुष्टीकरणाला कंटाळलेल्या भारतीयांनी भाजपला बहुमत दिले. यानंतर टोपी घालणाऱ्या आणि इतरांना घालण्यास लावणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली आणि त्यानंतर इफ्तार पार्ट्या हळूहळू का होईना कमी होऊ लागल्या होत्या.
 
त्यानंतर आज म्हणजे २०२५ मध्ये इफ्तारचे राजकारण पुन्हा आले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगने गुरूवारी २० मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यासाठी अनेक विरोधी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. इफ्तार पार्टीला उपस्थित राहिलेल्यांमध्ये सर्वात मोठे नाव हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गेही यामध्ये सामील झाले. दोन्ही नेत्यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आप नेते संजय सिंह यांच्यासोबतही इफ्तार पार्टी करण्यात आली होती.
 
 
 
जेव्हा त्याचे फोटो बाहेर आले तेव्हा लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. या इफ्तारच्या फक्त २ महिन्यांआधी, १४ वर्षानंतर हिंदूंचा सर्वात मोठा मेळा, महाकुंभ प्रयागराजमध्ये झालाय काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि सिलचरपासून पोरबंदरपर्यंत हिंदू महाकुंभात सामिल झाले होते. वाहने आणि इतर बसेस भक्तांनी भरल्या होत्या. प्रयागराजच्या आजाबाजूला असणारी शहरे २००-४०० किमी अंतरापर्यंत महाकुंभासाठी भाविकांनी खचाखच भरल्या होत्या. पण ६० कोटींच्या संख्येत २ नावे गहाळ झाली होती.
 
यात एक नाव हे काँग्रेसच्या डी-फॅक्टो प्रमुख असलेल्या सोनिया गांधी यांचे होते. ज्यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. दुसरे नाव होते ते म्हणजे दत्तात्रेय ब्राह्मण राहुल गांधी महाकुंभात या दोघांना कोणीही पाहू शकलेले नाही. २०२४ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी त्यापासून दूर राहिल्या आहेत. विशेष म्हणजे हे कुटुंब प्रयागराजमधून येते. मात्र तरीही त्यांना प्रयागराजमधील महाकुंभला जावेसे वाटले नाही हे एक विडंबन असल्यासारखेच आहे.