राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू होणार

    21-Mar-2025
Total Views |
 
CBSE implemented in state education board schools Dada Bhuse
 
मुंबई : ( CBSE implemented in state education board schools Dada Bhuse ) ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाबाबत प्रश्न विचारला. यावर लेखी उत्तर देत दादा भुसे यांनी राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिल्याची माहिती दिली.राज्यातील ‘राज्य शिक्षण मंडळां’च्या शाळांना ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
 
विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ‘स्टेट बोर्ड’ शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘सीबीएसई’ पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६  या वर्षापासून ‘सीबीएसई’ पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ लागावी, या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी उत्तरात नमूद केले.
 
“राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या आराखड्याला ‘सुकाणू समिती’ने मान्यता दिली का?” असा प्रश्न आ. प्रसाद लाड यांनी विचारला. त्यावर, ‘सीबीएसई’अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून दि. १ एप्रिल रोजीपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.