देहरादून : उत्तराखंडमध्ये अवैध मदरशांवर (llegal madrasas) धामी सरकारने अॅक्शन घेतली आहे. अनेक मदरशांना टाळे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी उधम सिंह नगर येथे १६ आणि हरिद्वारमध्ये दोन अवैध मदरशांना टाळे लावण्यात आले आहे. ज्यात धर्माच्या नावाखाली अनेक अवैध काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, आतापर्यंत उत्तराखंडमध्ये ११० मदरशांना टाळे लावण्यात आले आहे. मागील एका महिन्यात उत्तराखंड राज्य सरकारने अवैध मदरशांवर कारवाई केली.
संबंधित मदरशांमध्ये वाईट काम सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या परवानगी शिवाय मदरशांचा बंदोबस्त लावण्यात आला. यावेळी धामी यांनी मदरशांवर कारवाई करण्यासाठी सरकारी पोलीस यंत्रणेकडे कायदा दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. संपूर्ण राज्यभरात अवैध मदरशांमध्ये संबंधित प्रकरणावर अभियान लागू करण्यात आले होते.
#WATCH | Haridwar, Uttarakhand: Ajayveer Singh, SDM Haridwar says, "Orders have been given to take action and seal those madrasas which are neither registered with the Madrasa Board nor with the Education Department. Two madrasas have been sealed in Gandi Khata of Shyampur police… pic.twitter.com/orxxstcC3b
प्रशासनाने सांगितले की. अवैध मदरशांवर कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मदरशांमध्ये लहान विद्यार्थ्यांना नेमके काय शिक्षण दिले जाते? यामागे नेमकी कोणती ट्रेनिंग दिली जाते. गुरूवारी उत्तराखंडमधील रुद्गपूरमध्ये ४, किच्छामध्ये ८, बाजपुरात तीन, जसपुरमध्ये एक आणि हरिद्वारमध्ये दोन मदऱसांना टाळे लावण्यात आले आहेत. याआधी देहरादून, पौडीमध्ये असणाऱ्या एका रस्त्यांवरील अवैघ मदरशांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले होते. ज्यामध्ये ९२ मदरशांवर टाळे लावण्यात आले होते.
दरम्यान, बृहस्पतिवारच्या श्यामपुर भागातील गंडीखाटाच्या प्रशासन दाखल झाले असून त्यांनी अवैध मदरशांना टाळे लावले आहेत. गंडीखाटाच्या गुर्जर वस्तीत विना रजिस्ट्रेशन मदरसा सुरू होती. धामी सरकारने अवैध विना रजिस्टर असणाऱ्या मदरशांना लक्ष्य करण्यास सांगितले. यावेळी हरिद्वारच्या डीएमके कमेंद्र सिंह यांनी सांगितले की, ६० हून अधिक विना रजिस्ट्रेशन असणाऱ्या मदरशांना टाळे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.