मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना समोर आली आहे (handling protected snake). नवी मुंबईतील घणसोली येथे बोगस सर्पमित्रांनी या आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्यासाठी देऊन त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केले (handling protected snake). यासंदर्भात ठाणे वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वन विभागाकडून चौकशी सुरू आहे (handling protected snake). महत्त्वाचे म्हणजे सर्पमित्रांनी आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्याची परवानागी कोणाच्या बळावर दिली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (handling protected snake)
दि. १५ मार्च रोजी घणसोली येथील कांदळवन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सर माईक हाॅल्सटन आणि मिकाएल अपॅरिसियो हे स्थानिक सर्पमित्रांसह जमले होते. सर्पमित्रांना या दोन्ही इन्फ्लूएन्सरना नाग हाताळण्यासाठी दिला. या दोन्ही इन्फ्लूएन्सरने या सापांसोबत खेळ करुन त्याचे व्हिडीओ आपल्या सोशल मिडियावर प्रसारित केले. यामुळे सर्पमित्रांनी हा नाग कुठून पकडला?, आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरकरिता स्थानिक सर्पमित्रांनी या सापाला पकडले होते का?, नागाला हाताळण्याची परवानगी कोणी दिली, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात प्राणिमित्र आनंद मोहिते यांनी ठाणे वन विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे. हे लोकं जमलेल्या ठिकाणी सापाला पकडण्यासाठी वापरात आणलेला प्लास्टिकचा डब्बा आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी ठाणे वन विभागाने तपासाला सुरुवात केली आहे. महत्त्त्वाचे म्हणजे वनमंत्री राहत असलेल्या नवी मुंबई हे बेकायदा कृत्य घडले आहे.