उषा इंटरनॅशनलची मुंबई इंडियन्ससोबत सलग बाराव्याव्या वर्षी भागीदारी
20-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली: भारतातील आघाडीचा टिकाऊ वस्तूंचा ब्रँड, उषा इंटरनॅशनलने पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (मेन्स) क्रिकेट संघासोबत पुन्हा एकदा नव्याने भागीदारी केली आहे. यामुळे त्यांच्या भागीदारीची सलग १२ वर्षे पूर्ण होत आहेत. ही भागीदारी मुंबई इंडियन्सच्या “प्ले लाईक मुंबई” या ब्रीदवाक्याशी जुळते. हे वाक्य मुंबईतील क्रिकेटचा आत्मा दर्शवते आणि त्याचबरोबर ‘उषा’च्या सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेशीही एकरूप ठरते.
बहुप्रतिक्षित २०२५ क्रिकेट हंगामाची सुरुवात २२ मार्च रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जाणार आहे. या भागीदारीचे निशाण म्हणून, 'उषा'चा लोगो मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंच्या कॅप्स आणि हेल्मेटवर ठळकपणे दिसेल, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेत दृश्यमानता सुनिश्चित होईल. याव्यतिरिक्त, 'उषा प्ले' हे ब्रँडिंग सामन्यांदरम्यान पेरिमिटर बोर्ड आणि डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांशी अधिक संवाद साधला जाईल.
या नित्य सहकार्यावर भाष्य करताना, उषा इंटरनॅशनलच्या क्रीडा उपक्रम आणि संघटना प्रमुख कोमल मेहरा म्हणाल्या, "उत्कृष्टता, सहनशीलता आणि खेळाची आवड या समान मूल्यांवर आधारित असलेली आमची मुंबई इंडियन्ससोबतची भागीदारी कालांतराने अधिक मजबूत झाली आहे. भारतात आणि जागतिक स्तरावरही क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही - ती एक भावना आहे जी लाखो लोकांना एकत्र आणते. लोकांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करताना आम्ही या भावनेचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. आम्हाला उत्साहवर्धक क्रिकेट पाहण्याची आणि चाहत्यांशी अधिक सखोलपणे जोडले जाण्याची अपेक्षा आहे."
मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने सांगितले, "उषा इंटरनॅशनल हे एका दशकाहून अधिक काळ आमच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही ही भागीदारी पुढे चालू ठेवण्यास आनंदित आहोत. मुंबई इंडियन्सशी आणि क्रीडा, फिटनेस व आरोग्य यांबद्दलच्या भूमिकेशी वर्षांनुवर्षे असलेली त्यांची बांधिलकी आमच्या संघाच्या तत्त्वज्ञानाशी जुळते. आम्ही आणखी एका ॲक्शन-पॅक हंगामासाठी सज्ज होत असताना, आम्ही ही भागीदारी अधिक मजबूत करण्यास आणि आमच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण आणि आठवणी तयार करण्यास उत्सुक आहोत." मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे, आणि रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह इतर खेळाडूंचा भक्कम पाठिंबा आहे.
‘उषा’ संपूर्ण भारतात सर्वसमावेशक क्रीडा उपक्रमांचा खंबीर पुरस्कर्ता आहे. मुंबई इंडियन्ससोबतच्या संलग्नतेव्यतिरिक्त, हा ब्रँड अल्टीमेट फ्लाइंग डिस्क, फुटबॉल, लेडीज ॲमेच्युअर आणि ज्युनियर गोल्फ, कर्णबधिरांसाठी क्रिकेट आणि दृष्टीबाधितांसाठी ॲथलेटिक्स, कबड्डी, ज्युडो आणि पॉवरलिफ्टिंग यांसारख्या विविध खेळांना सक्रियपणे समर्थन देतो. ‘उषा’ कलारीपयट्टू, मल्लखांब, सियाट खनाम, थांग-टा, तुराई कबड्डी, साझ-लॉन्ग, मर्दानी खेळ, योग आणि सिलंबम यांसारख्या देशी भारतीय खेळांना पुनरुज्जीवित करण्यासाठीही अत्यंत वचनबद्ध आहे.