तब्बल 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स परतल्या

    20-Mar-2025
Total Views |

Sunita Williams returns after 9 months
 
वॉशिंग्टन : ( Sunita Williams returns after 9 months ) ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. दोन्ही अंतराळवीर बुधवार, दि. १९ मार्च रोजी पहाटे ३.२७ वाजता ‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’मधून परतले. निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील त्यांच्यासोबत होते. या चौघांचेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात यशस्वी लॅण्डिंग झाले आहे. त्या ठिकाणावरून ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ टीमने त्यांना बाहेर काढले.
 
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) सुमारे नऊ महिने राहिले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दि. ५ जून २०२४ रोजी ‘आयएसएस’वर पोहोचले. त्यांची भेट फक्त आठ दिवसांची होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तिथे नऊ महिने राहावे लागले. या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी १७ तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनार्‍यावर सुरक्षितपणे उतरले.
 
परतीच्या प्रवासादरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी १७ तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनार्‍यावर सुरक्षितपणे उतरले. परतीच्या प्रवासादरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत, ‘क्रू-९’चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्हदेखील परतले.