नागपूर हिंसाचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड! दंगलीतील आरोपी नागपूरच्या बाहेरचे; काय आहे कनेक्शन?

20 Mar 2025 12:26:29
 
Nagpur Violence
 
नागपूर : संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नागपूर हिंसाचार प्रकरणातील अनेक आरोपी नागपूरच्या बाहेरचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ते कुठून आले याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती सायबर खात्याचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी गुरुवारी दिली.
 
पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचारातील आरोपींमध्ये काही बाहेरचे लोक असून त्यांचा तपास सुरु आहे. तसेच फहीम खान हाच या घटनेतील मास्टरमाईंड असून हळूहळू आणखी काही सूत्रधारांचे नाव पुढे येईल.फहीम खानसह आणखी काही लोकांकडून विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाच्या व्हिडीओमध्ये छेडछाड करून तो पसरवण्यात आला. तसेच काही लोकांनी हिंसाराचाशी संबंधित व्हिडीओ पसरवून आणखी हिंसाचारास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. फहीम खानच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट मिळाल्या असून त्यामुळेच ही घटना घडली आहे. फहीम खानवर कलम १५२ लागू करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? - दिशा सालियानचा सामुहिक बलात्कार करूनच हत्या! वडील सतीश सालियान यांची हायकोर्टात याचिका
 
फहीम खानसह ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी काही आरोपींची नावे पुढे येऊ शकतात. आतापर्यंत ४ एफआयआर दाखल झाले असून यात ५० हून अधिक आरोपी आहेत. हिंसाचार वाढवण्यासाठी अल्लाहू अकबर आणि सर तन से जुदा अशा पोस्ट टाकण्यात आले आहेत. अशा पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील असे सगळे पेजेस तपासून ते ब्लॉक करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0