ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

20 Mar 2025 16:11:04
 
Maharashtra Bhushan Award announced to veteran sculptor Ram Sutar
 
मुंबई: ( Maharashtra Bhushan Award announced to veteran sculptor Ram Sutar ) महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. २० मार्च रोजी विधानसभेत केली.
 
याबाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत.
 
या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 

Powered By Sangraha 9.0