मुबंई : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील ६ ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, २० मार्च रोजी दिली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, रामदासपेठ (अकोला शहर), मूर्तिजापूर आणि पातूर याठिकाणी बांगलादेशी, घुसखोरांनी बनावट कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), २२९, २३६, २३७, ३१८(४), ३३६(३), ३४०(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - दिशा सालियान प्रकरणात मंत्री नितेश राणेंची मोठी मागणी, म्हणाले, "आदित्य ठाकरेंना..."
याअंतर्गत एकूण ५२ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये आमना बी शमशोद्दीन, अनामत खान अताउल्ला खान, शहीद खान गुल खान, शहनाज बानो जे. अन्सार अली, अब्दुल मुस्ताक अब्दुल रहीम, अब्दुल जाबीर शेख गुलाब, सय्यदा तस्निमुन निसा अब्दुल सादिक, अब्दुल रहमान अब्दुल रौफ, अन्सार अली हमीद अली, शेख अमीर शेख हारून, तौसीर खान नासिर खान, झाकिराबी माजीद खान, रेहानाबी अब्दुल सत्तार, जेबुनिसा अझीझ खान, साई. असिक अली सै. लियाकत अली, शकिलाबी शेरखान, शेख मुसा शेख रौफ, शे. बिस्मिल्लाह शे. अब्दुल्ला, अकिलाबी शेरखान, जहारा बेगम मोहम्मद शफी, मौलाना अब्दुल अझीझ, रफीकुन्निसा अब्दुल जब्बार, शेख शब्बीर शेख नजीर, रुबिना परवीन शेख अहमद, शकील अहमद अब्दुल कादिर, मेहबूब खान नजुल्ला खान, अब्दुल मुजीब अब्दुल कादीर, शेख मेहताब शेख अल्ताफ, शेख मोहम्मद करीम शेख, मोहम्मद जुबेर मोहम्मद युनूस, मोहम्मद आसिफ मोहम्मद युनूस, शाहीन बानो महबूब खान, रुबिना फिरदोस कासम शाह, इलियास खान अब्दुल खान, खेरुन्निसा शेख जलील, जरीना परवीन अब्दुल आसिफ, फिरोज अब्दुल अझीझ, सय्यद तकरीम सय्यद नईम, सुलतान परवीन अयुब यांच्यासह इतर जणांचा समावेश आहे.