दिशा सालियानची हत्या सामूहिक बलात्कारानंतरच

20 Mar 2025 13:10:57
 
 Disha Salian was murdered after being gang-raped Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court
 
मुंबई: ( Disha Salian was murdered after being gang-raped  Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court ) दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकत हे प्रकरण दाबले. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली असून या प्रकरणाची ‘एनआयए’ चौकशीची करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
आदित्य ठाकरेंवर आरोप
 
“दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याच्या देखरेखीखाली करण्यात यावा,” अशी मागणीही सतीश सालियान यांनी केली आहे. यासोबतच आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवरही या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
 
ये तो सिर्फ शुरुवात है!
 
“त्या दि. 8 जून रोजीच्या पार्टीमध्ये लहान मुलांची काय इन्व्हॉलमेंट होती, हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आता तर पुस्तकाची दोन पाने उघडली आहेत. दिशा सालियनच्या वडिलांनी आता सत्य सांगण्यास सुरुवात केली आहे. किशोरी पेडणेकर त्यादिवशी त्या घरात काय करत होत्या, ते त्यांना विचारा. केस दाबण्यासाठी यांनी काय काय केले, ते आता समोर येईल. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आता सगळेच बाहेर येईल.
 
- नितेश राणे, कॅबिनेटमंत्री
 
 
Powered By Sangraha 9.0