गाझा : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू होताच आता इस्रायलने २ मार्च रोजी गाझा पट्टीत सर्व वस्तू आणि पुरवठ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना आणि हमासच्या अलिकडील धोरणाबाबत इस्रायलने ही कारवाई केली. खरं, तर युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर, दहशतवादी हमासने अमेरिका समर्थित युद्धबंदी वाढवण्यास नकार दिला आहे.
गाझाच्या पहिल्या युद्धाच्या टप्प्याची शनिवारी सांगता झाली. या करारानुसार, जानेवारीच्या माध्यमातून इस्रायली पोलीस आणि शेकडो पॅलिस्टिनी कैद्यांना सोडवण्यात आले आहेत. इस्त्रायलच्या कराराचा पहिला टप्पा इस्लामिक रमजान महिना आणि यहुदी पास महिन्यापर्यंत सुरू राहावा अशी इच्छा आहे. तसेच हमाससाठी काराराच्या दुसऱ्या टप्प्यावर अद्यापही चर्चा होणे बाकी आहे.
पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि गाझामध्ये मानवतावादी मदत पुरवठा करण्याच्या बदल्यात हमासने त्यांचे जिवंत आणि मृत ओलिस पुन्हा परत केले जावे अशी इस्रायलने इच्छा व्यक्त केली. गाझामध्ये २४ इस्रायली अजूनही जिवंत असल्याचे मानले जात कराराच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत इस्रायलने मदत सेवांना गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली.