पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार
19-Mar-2025
Total Views | 52
लखनऊ (Saurav Murder) : उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आणि संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत असलेला सौरव हा ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रनगर परिसरातील पत्नी मुस्कान आणि सहा वर्षांच्या मुलीसोबत भाडेतत्वाच्या खोलीत वास्तव्य करत होता. सौरव आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला असून सौरव हा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होता. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये तो मेरठला रजेवर आला होता. आपल्या पत्नीचा वाढ दिवस जवळ आल्याने त्याने वाढ दिवसाचे औचित्य साधून त्याने रजा घेतली होती. मात्र, मुस्कानचे एका साहिल नावाच्या एका पत्नीशी प्रेमसंबंध सुरू होते. दोघांमध्ये जवळीकता वाढली होची त्यांनी सौरवला संपवण्याचा कटही रचला होता.
Wife and paramour murder husband, Saurabh Rajput, a merchant navy officer.
He come to India to celebrate his daughter's 6th birthday.
On March 4, they allegedly stabbed Saurabh to death, dismembered his body into 15 pieces, and concealed the remains in a plastic drum filled… pic.twitter.com/kYhKlEaUzP
— Sahodar - Equality For Men (@SahodarIndia) March 19, 2025
सौरव घरी परतल्यानंतर मुस्कान आणि साहिलने मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका मोठ्या पाण्याच्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. ज्यात लोखंडी झाकण ठेवत सिमेंटने ड्रम सील करण्यात आला. सौरवर बेपत्ता झाला असून संबंदित प्रकरणी कोणालाही त्याची भनक लागू नये म्हणून मुस्कान त्याच्या मोबाईलवरून सौरवरच्या कुटुंबियांना मेसेज आणि कॉल करत राहिला, परंतु सौरवर अनेक दिवसा नाही तेव्हा कुटुंबियांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या दरम्यान, मुस्कानच्या वडिलांनी सत्याची साथ देत आपल्याच मुलीला दोषी ठरवले आहे. त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली अ,सून त्यांच्या मुलीचा गुन्हा उघडकीस आणण्यास कोणतीही एक कसर सोडली नाही. यावेळी पोलिसांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यावेळी घटनास्थळी असलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावेळी पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना अटक केली आणि त्यांची चौकशी सुरू आहे.