नवी दिल्ली : नागपूर दंगलीमुळे राज्य ढवळून निघाले आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या नागपूरातील दंगलीतील प्रमुख आरोपी फहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. औरंगजेबाची कबर तोडण्यावरून हिंदूंनी आपली आक्रमकता दर्शवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. अशातच आता इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिम जमावाने तोडफोड आणि दगडफेक करत नकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
नेमकं काय म्हणाले राजीव सरदेसाई?
औरंगजेबाची कबर खोदून द्वेष निर्माण करत तुम्हाला संबंधित प्रकरणी काही प्रतक्रिया असणे गरजेचे आहे, असे वक्तव्य राजदीप सरदेसाई यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नागपूरात कट्टरपंथी मुस्लिमांनी केलेल्या या हल्ल्यानंतर वाहने जाळण्यात आली आणि मालमत्तांची तोडफोड करण्यात आली आणि रस्त्यांवर दगडांचे ढीग दिसून येत आहेत, असे सरदेसाई म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम जमावाने आणि हिंदू गटांमध्ये झालेल्या हिंसक परिस्थिती निर्माण झाली आणि नागपूरात तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. एका वृत्तानुसार, औरंगजेबाच्या कबरीवरून निदर्शनादरम्यान कुराण जाळल्याच्या अप्रमणित अफवांमुळे शहरात अशांतता पसरली आहे.
संबंधित प्रकरणाच्या हिंसाचारात १५ पोलीस अधिकारी आणि ५ नागरिक जखमी झाले आणि त्यात बेशिस्तपणे कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची तो़डफोड करण्यात आली आणि वाहनेही जाळण्यात आली आहेत. आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात कलम १४४ लागू करण्यात आला. सुरुवातीला चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसाचार उफाळला आणि नंतर तो कोतवाली आणि महाल भागात आणि नंतर हंसापुरीपर्यंत पसरला.