नागपूर : नागपूर दंगलीत १७ मार्च २०२५ रोजी झालेल्या दंगलीप्रकरणातील हिंसाचारातील आरोप फहीम खानला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फहिमला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणाहून त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीमवर दंगल भडकवण्याच्या आणि लोकांना चिथावणी देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
दंगलीमुळे शहरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या २०० जणांची ओळख पटवण्यात आली आहे. असा दावा पोलिसांनी केला असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ एफआरआय दाखल करण्यात आले आहे.
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खानने सुरूवातीला पोलीस ठाणे गाठले होते आणि बजरंग दलाविरोधात तक्रार दाखल केली होती. फहीमवर लोकांनी दंगल भडकवल्या प्रकरणी आरोप केला होता. ज्यात हिंसाचार करण्यात आल्याने हिंसाचाराला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे. दरम्यान प्रसंग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दंगलीमध्ये अनेक लोक हे जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दंगलीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि फहीम खान हे मायनॉरिटी डेमक्रॉटीक संस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले.
अशातच संबंधित दंगलीमध्ये नागपूर हिंसाचारात नागपूर हिंसाचारात जबाबदार असलेल्यांनीही अल्पवयीन मुलांचा वापक केला होता. यामुळे नागपूर पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. या हिंसाचारामागे नेमके कोण आहे? तसेच मुलांना या हिंसक परिस्थितीत कोणी ओढले? अशा अनेक निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा पोलीस तपास करत आहेत.