धक्कादायक! नागपूर हिंसाचार प्रकरणात महिला पोलिसाचा विनयभंग; अश्लील शिवीगाळ अन्...

19 Mar 2025 13:04:44
 
Nagpur Violence Women Police
 
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी महिला पोलिसाची वर्दी खेचत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बुधवार, १९ मार्च रोजी आमदार प्रविण दटके यांनी सभागृहात याबद्दलची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, "भालदारपुरा येथे सुमारे ५०० जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरु केली. त्यातच शिविगाळसुद्धा केली. पोलिसांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यातील काही जणांनी महिला पोलिसाला पकडून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न केला. परंतू, ती महिला त्या जमावातून बाहेर पडली. त्यानंतर काल तिने याबाबतची तक्रार नोंदवली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बघून त्या नराधमांवर कडक कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल! नेमकं कारण काय?
 
हिंसाचाराच्या घटनेदरम्यान एका आरोपीने अंधाराच फायदा घेत आरसीपी पथकातील कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाच्या गणवेशाला स्पर्श केला. तसेच आरोपींनी काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव करत शिवीगाळ केल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0