ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही शांततेसाठी वचनबद्ध - तुलसी गॅबार्ड

    19-Mar-2025
Total Views |

Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard
 
नवी दिल्ली: ( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
 
भारत दौऱ्यावर आलेल्या तुलसी गॅबार्ड यांनी नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना डायलॉग २०२५ कार्यक्रमात भाग घेतला. मंगळवारी रायसीना डायलॉग २०२५ मध्ये मुख्य भाषण देताना तुलसी गॅबार्ड यांनी स्पष्ट केले की 'अमेरिका फर्स्ट' म्हणजे फक्त अमेरिका नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकांविषयी अनेकदा गैरसमज करून घेतले जातात, असेही त्या म्हणाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करणारे आणि एकात्मता निर्माण करणारे नेते म्हणून वारसा सोडू इच्छितात, असेही त्या म्हणाल्या.
 
गॅबार्ड पुढे म्हणाल्या, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी पंतप्रधान मोदींचा वॉशिंग्टनचा पहिला दौरा हा वैयक्तिक मैत्रीचा होता. हे त्यांच्या प्राधान्यक्रम आणि कृती निश्चित करण्याचे आणि त्यांच्या देशांच्या सर्वोत्तम हितासाठी काम करण्याचे लक्षण होते, असेही गॅबार्ड यांनी यावेळी नमूद केले आहे.