नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे खटले प्रलंबित करण्यात आले आहेत. कारण राज्यात सीबीआयची विशेष न्यायालये नाहीत, अशी टीका करताना त्यांनी संबंधित प्रकरणाची आठवण करून दिली आहे. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी सीबीआयबाबत चिंता व्यक्त केल्याने वादाला तोंड फुटले आहे. अशातच अमित शाह यांनी स्पष्ट केले की, सीबीआय त्यांच्या मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नसून चर्चेच्या केंद्रबिंदूपासून दूर गेली अशी टीका केली आहे. यावेळी गोखले यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून निरर्थक प्रत्युत्तरादाखल अमित शाह हे मला घाबरत असल्याचा दावा केला.
यावर अमित शाह म्हणाले की, "निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मी राज्यसभेत आपले स्थान निश्चित कर शकलो. सात निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. कोणाच्या दयेने आणि मदतीने नाही. भाजपवर टीका केल्यानंतर ममता बॅनर्जींनी वरिष्ठ सभागृहात गोखले यांना नामांकित केला", असा दावा केला.
गोखले यांनी वैयक्तिक टिप्पणी केल्यानंतर, शाह यांनी दिलेल्या उत्तरावर ते म्हणाले की, "ते स्वतंत्रपणे त्यांच्या पदावर पोहोचले आहेत. त्यांना घाबरवण्याचे कोणतेही एक कारण नाही. गोखले यांनी सीबीआयकडे ६ हजार ९०० भ्रष्टाचाराचे खटले दाखल केले असून त्यापैकी ३६१ प्रकरणे दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित करण्यात आला. ज्यामुळे सभागृहामध्ये गदारोळ माजला आहे.
अशातच अमित शाहांनी स्पष्ट केले की, यापैकी इतरही अनेक प्रकरणे प. बंगाल निवडणूक हिंसाचाराच्या न्यायालयीन आदेशानुसार, झालेल्या चौकशीतून उद्धवली गेली आहेत. ज्या ठिकाणी भाजपच्या समर्थकांवर ह्ल्ला करण्यात आला होता. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर न्यायालयीन निर्देशांकडे दुर्लक्ष करत आरोपही करण्यात आले आहेत.