नागपूर हिंसाचाराचा सुत्रधार फहीम खानच्या मुसक्या आवळल्या! नितीन गडकरींविरोधात लढवली होती निवडणूक

19 Mar 2025 15:39:16
 
Faheem Khan Arrested
 
नागूपर : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान यानेच जमाव जमवला असून त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सोमवारी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे फहीम खान हा विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने कट्टरपंथींयांचा जमाव जमवत हिंसाचारासाठी त्यांना प्रवृत्त केले. त्यामुळे फहीम खान हाच या घटनेचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  नागपूरात संचारबंदी कायम! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
 
नागपूर हिंसाचाराच्या घटनेत फहीम खानसह ५१ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ३८ वर्षीय फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
 
नितीन गडकरींविरुद्ध लढवली निवडणूक
 
फहीम खान याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात २०२४ मध्ये नागपूर लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्याचा दारूण पराभव झाला होता. त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0