नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव समोर! कोण आहे दंगलीला जबाबदार?

19 Mar 2025 12:00:01
 
Nagpur Violence Fahim Khan
 
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना यासंदर्भात आता एक नवीन अपडेट पुढे आली आहे. या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यादृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
 
सोमवार, १७ मार्च रोजी रात्री नागपूरमधील काही भागात हिंसाचाराची घटना घडली. दोन गटात वाद निर्माण होऊन हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
 
या घटनेनंतर नागपूरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागपूरातील अनेक भागांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत नागपूर हिंसाचार प्रकरणातील ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, फहीम खान हा या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचीही माहिती पुढे आली आहे. फहीम शमीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. त्यानेच आरोपींना प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0