आंचल गोयल मुंबईच्या नव्या जिल्हाधिकारी

19 Mar 2025 13:10:57
 
Aanchal Goyal is the new Collector of Mumbai
 
मुंबई :  ( Aanchal Goyal is the new Collector of Mumbai ) मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची दि. २५ फेब्रुवारी रोजी बदली केल्यानंतर, त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, दि. १८ मार्च रोजी ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
 
गोयल या नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होत्या. त्या २०१४ बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्याशिवाय श्री अंकित यांची छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, मीनल कर्णवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, कवली मेघना यांची नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, करिष्मा नायर यांची नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर, रणजित यादव यांच्याकडे आयटीडीपी गडचिरोली आणि उपजिल्हाधिकारी गडचिरोली या पदांचा भार देण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0